पसायदान:आदित्य प्रतिष्ठानचे सांस्कृतिक संकुल कर्वेनगर येथे जलदगतीने साकार होत आहे.

Recent Event : मनसेकडून मराठी राजभाषा दिना निमित्त मराठी साठी विशेष योगदानासाठी गुरुदेवांचा सत्कार !

पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम 

 

]

दैनंदिन सुविचार 

पसायदान 

ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा सूर्य आणि भक्तीचा चंद्र ! त्या ज्ञानसूर्याच्या उजेडात आणि त्याचवेळी त्यांच्या शीतल भक्तीच्या  चांदण्यात अगणित भक्तांची वाटचाल  झाली आहे आणि पुढेही होणार आहे. 

या विश्वाचे स्वानंदसाम्राज्य करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपली अनुभूती पसायदानाच्या रूपाने अमृतमधुर शब्दकळेने, पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतलतेने आणि गंगाजलाच्या पावित्र्याने अंतःकरणपूर्वक सजवली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या अलौकिक चरित्राचा आणि चारित्र्याचा पावन आणि महन्मंगल कलश म्हणजे पसायदान होय.

'पसायदान' हा गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे आदित्य प्रतिष्ठानचे गौरवशाली प्रकाशन आहे. पसायदानाची १० वी आवृत्ती दि. २५ डिसेंबर २०२० (मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, गीताजयंती) या मंगल दिनी प्रकाशित झाली. ज्ञानदेव माउलींनी 'ज्ञानेश्वरी' ही गीतेवर टीका लिहिली. ती अजरामर झाली. त्यातीलच शेवटी ईश्वराकडे जे मागणे माउलीनी मागितले ते म्हणजे 'पसायदान !' त्या नऊ ओव्यांमधे केवढा व्यापक अर्थ भरून राहिला आहे ते गुरुदेव अभ्यंकरांनी त्यांच्या ओघवत्या व प्रासादिक शैलीत या ग्रंथामधे उलगडून सांगितले आहे. हा ग्रंथ अभ्यासकांना अतिशय आवडला .

या ग्रंथाची १० वी आवृत्ती गीताजयंतीच्या शुभदिनी प्रकाशित व्हावी हा  महन्मंगल योग आहे. आपल्या घरातील, कुटुंबातील, समाजातील सर्व तरुणाना हा ग्रंथ वाचण्यासाठी आपण प्रवृत्त करा. त्यांचे जीवन उजळून जाईल. 

- सौ. अपर्णा अभ्यंकर
( कार्यकारी विश्वस्त, आदित्य प्रतिष्ठान )

मूळ किंमत . ३००/- सवलत उपलब्ध.
संपर्क : आदित्य प्रतिष्ठान, १५ वेदान्तनगरी सोसायटी कर्वेनगर, पुणे - ४११०५२
दूरभाष : 8484921130
E mail - aditya.pratishthan25@gmail.com
Website - www.adityapratishthan.org/

श्रीगणपति अथर्वशीर्ष 

हिंदू धर्म व संस्कृतीत श्रीगणेशाचे स्थान एकमेवाद्वितीय असे आहे. भारतात सर्वत्र प्रत्येक मंगल कार्यारंभी श्रीगणेशाला वंदन केले जाते. प्रत्येक धार्मिक कार्यारंभी श्रीगणेशाचेच पूजन होते.  ॐकार म्हणजे श्रीगणेशाचे नादब्रह्म स्वरूप होय. या ॐकार गणेशाचे ध्यान कोट्यवधी भारतीय प्रतिदिनी श्रद्धेने करतात. 

अशा या श्रेष्ठ श्रीगणेशावर अनेक स्तोत्रे लिहिली आहेत. तथापि अथर्वशीर्षाची लोकप्रियता अन्य कोणत्याही स्तोत्राला लाभलेली नाही. 

महाराष्ट्रात, भारतात व परदेशात पसरलेल्या असंख्य मराठी उपासकांना अथर्वशीर्षाचे रहस्य कळावे, म्हणून हा ग्रंथ गुरुदेव अभ्यंकर यांनी लिहिला आहे. 

या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे आहे कि अथर्वशीर्षाचे प्रत्येक पद अर्थासह दृष्टान्ताद्वारे गुरुदेवांनी उलगडले आहे. स्पष्ट केले आहे.  अथर्वशीर्षातील प्रत्येक पदाचा 'गाभा' या ग्रंथात दिला आहे. त्याच्या वारंवार अध्ययनाने अभ्यासकाच्या, उपासकाच्या बुद्धीत  अथर्वशीर्षाचा गाभा उमजत जाईल. 

गुरुदेव शंकर अभ्यंकर लिखित  'श्रीगणपति अथर्वशीर्ष' ग्रंथाच्या सात आवृत्ती दहा वर्षात संपल्या. त्यानंतर पाच वर्ष या ग्रंथाचे पुनर्मुद्रण इतर ग्रंथाच्या प्रकाशनामुळे झाले नाही. परंतु वाचकांकडून या ग्रंथाची सातत्याने मागणी होत आहे. आदित्य प्रतिष्ठानचे हे गौरवशाली व पुरस्कार प्राप्त प्रकाशन आहे. 

दि. २८ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित झालेल्या या आठव्या आवृत्तीच्या निमित्ताने हा ग्रंथ भविष्यात सगळ्या जगात- जिथे अथर्वशीर्षाचा पाठ केला जातो, त्या प्रत्येक कुटुंबात, घरात जावा, त्याच्या वाचनाने, विचाराने-उच्चाराने-आचरणाने सर्व कुटुंबाना सौख्य प्राप्त व्हावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 

- सौ. अपर्णा अभ्यंकर
( कार्यकारी विश्वस्त, आदित्य प्रतिष्ठान )

मूळ किंमत . ५००/- सवलत उपलब्ध.
संपर्क : आदित्य प्रतिष्ठान, १५ वेदान्तनगरी सोसायटी कर्वेनगर, पुणे - ४११०५२
दूरभाष : 8484921130
E mail - aditya.pratishthan25@gmail.com
Website - www.adityapratishthan.org/