+91-8484921130 [email protected]

सैनिकांच्या सहवासात !

काल दिवाळीची सुरवात QMTI येथील सैनिकांच्या सहवासात फार उत्साहपूर्ण झाली . या संस्थेचे गीत अतिशय उत्साहवर्धक आहे. त्यांचा जोश , उत्साह , टाळ्या इतक्या आवेशपूर्ण होत्या की आपण फार मिळमिळीत जीवन जगतो असे वाटते . ‘भारतमाता की जय ‘ चा उद्‌घोष जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या देशाला क्षती नाही.

गुरुदेव आणि २० -२५ आदित्यव्रती यांनी कारगील हॉलमधे ३.३० प्रवेश केला . परिचय सत्कार झाल्यावर पाऊण तास गुरुदेवांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले . कॅप्टन चितळे , लेफ्टनंट जनरल नवाथे हे सैन्यातील आपले प्रतिनिधी खूप उत्साहात होते . आदित्यने मेरी माटी मेरा देश ची माहिती सांगितली . जितेन्द्रने नंतर पूर्ण वन्दे मातरम् म्हटले . नंतर प्रातिनिधिक स्वरूपात ५ जणांना गुरुदेवांनी भेटवस्तू दिल्या . १५० जणांना फराळ व भेटवस्तू देण्यात आल्या . अतिशय हृद्य कार्यक्रम झाला.

– सौ . अपर्णा अभ्यंकर