ग्रंथ प्रकाशन सोहळा
प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले यांच्यापैकी भिलवडी येथील काकासाहेब चितळे यांच्या जीवनावरील ‘काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे’ हा चरित्रग्रंथ गुरुदेव शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते २६ जुलै रोजी प्रकाशित झाला. समारंभाला सर्व चितळे परिवार व अनेक मान्यवर उपस्थित होते. अभ्यंकर म्हणाले, काकासाहेब चितळे यांनी कृष्णाकाठी असलेल्या भिलवडी सारख्या गावी गोकुळ निर्माण केले. भगवत्गीतेत सांगितलेल्या कर्मयोगाप्रमाणे अनासक्ती मनात ठेवून त्यांनी आयुष्यभर कार्य केले. काकासाहेब खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगी होते.




