हृद्य सोहळा

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुर्ननिर्माण सोशल फाउंडेशन पुणे आणि विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या संस्थांच्या वतीने समाजातील बहुमोल योगदान देणाऱ्या समाज गुरूंचा सन्मान महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते २६ जुलैला करण्यात आला. यामध्ये गुरुदेवांना विशेष सन्मानित करण्यात आले.